Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीऑरेंजसिटीत चुडाराम बल्हारपुरे "पद्मगंधा" उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्काराने सन्मानित.. - राज्यस्तरावर मिळालेला सहावा...

ऑरेंजसिटीत चुडाराम बल्हारपुरे “पद्मगंधा” उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्काराने सन्मानित.. – राज्यस्तरावर मिळालेला सहावा पुरस्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह,व्होकार्ट हॉस्पिटल,नागपूर येथे नुकतेच झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा सन्मान करण्यात आला.सव्वीस वर्षाची साहित्यिक/सांस्कृतिक परंपरा असलेल्या पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी अनेक साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात मराठी नाट्यवाड्.मय साहित्य प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित व नाट्यश्री निर्मीत महापूजा अर्थात महासती सावित्री या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा ‘स्व.शकुंतला खोत उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित, शुभांगी भडभडे संस्थापित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या २६ व्या साहित्य संमेलन-२०२६ तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे,(विदर्भ प्रांत अध्यक्ष,अ.भा.साहित्य परिषद साहित्य भारती),डॉ.रंजन दारव्हेकर(ज्येष्ठ रंगकर्मी,लेखक व दिग्दर्शक),श्रीपाद अपराजित(निवासी संपादक,महाराष्ट्र टाइम्स,नागपूर)यांचे हस्ते प्रभाताई देऊस्कर (अध्यक्ष,पद्मगंधा प्रतिष्ठान),ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव जाधव,संस्थेच्या सहसचिव स्वाती मोहरीर,रेणूका लिमसे, श्यामा देशपांडे,अलका मोकाशी,राधिका राजंदेकर,राधा जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी ऑरेंजसिटीत मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.तर राज्यस्तरावर मिळालेला हा सहावा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल झाडीपट्टीत सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे, रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक),साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!