Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोषपूर्ण शैक्षणिक साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..!

दोषपूर्ण शैक्षणिक साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-एका कोचिंग क्लासला कंपनीने शैक्षणिक साहित्य पुरविले.मात्र,ते दोषपूर्ण निघाले. त्यामुळे क्लास चालकाने ग्राहक आयोगात धाव घेतली. प्रकरणी आयोगाने संबंधित क्लासला कंपनीने पैसे परत द्यावे,असे आदेश दिले.वर्धा येथील सतीश मनोहर सुपारे हे ‘ॲस्ट्रॉन्स इंटरनॅशनल लँग्वेजेस अकॅडमी’ चालवितात. अध्यापन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कोविड काळात ऑनलाइन वर्ग सुरळीतपणे घेता यावेत,या उद्देशाने त्यांनी सॉफ्टलॉजिक प्रा. लिमिटेड कंपनीचा इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड टेक्नोसेल मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी नागपूर यांच्याद्वारे खरेदी केला होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा सुपारे यांचा प्रयत्न होता.मात्र, सुरुवातीपासूनच बोर्डमध्ये लेखनातील त्रुटी, सॉफ्टवेअर बिघाड,हँग होणे व वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या.अनेकदा तक्रार करून व तंत्रज्ञांकडून दुरुस्ती करूनही दोष कायम राहिला.त्यामुळे अध्यापन कार्यात अडथळे निर्माण झाले.दोन वर्षे मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन केल्यानंतर त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. तक्रारदाराच्या वतीने ॲड.एच.के.चांडक यांनी युक्तिवाद केला.आयोगाने सॉफ्टलॉजिक प्रा.लिमिटेड कंपनीला एक लाख ३६ हजार ८५७ रुपये ९ टक्के वार्षिक व्याजासह ४५ दिवसांत सुपारे यांना परत करण्याचे आदेश दिले.तसेच सॉफ्टलॉजिक प्रा. लिमिटेड पुणे आणि टेक्नोसेल मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी नागपूर यांना संयुक्तपणे १५ हजार रुपये मानसिक त्रासाची भरपाई आणि १० हजार रुपये न्यायालयीन खर्च देण्याचे निर्देश दिले. आदेशाचे पालन न केल्यास १२ टक्के व्याज आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!