Sunday, May 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची क्षेत्रकार्यासाठी निवड..

देसाईगंजच्या अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची क्षेत्रकार्यासाठी निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डी.एस.भागडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळक नगरपरिषद प्राथमिक शाळा(विर्शी)वार्ड देसाईगंज शाळेत क्षेत्रकार्यासाठी निवड करण्यात आली आहे.यात अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे आर्यन मेश्राम, आदित्य धाकडे, भावना शेंडे,प्रतिक्षा निकोडे,निकेश लाडे ‌यांची निवड करण्यात आली असून नेमणूक दिलेल्या क्षेत्र कार्यात समस्याग्रस्त विद्यार्थ्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करणे,समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेचे शिक्षण देणे व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृध्दींगत करणे,असे कार्य करणे आहे. यासाठी लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळेतील प्रत्येक वर्गावर एका विद्यार्थ्याची नेमणूक करण्यात आली आहे.यासाठी विद्यार्थ्याने आपल्या वर्गातून एका अशिलाची निवड केली आहे.अशिलाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन,लिहायला आणि
वाचायला शिकवणे,त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे व इतर विविध उपक्रम घेणे,असे अनेक प्रकारचे कार्य सुरू आहेत.लोकमान्य टिळक नगरपरिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम कापगते,शिक्षक विष्णू सोळंके, शिक्षिका रीना बनसोड,उर्वशा ठाकरे यांचेसह शाळेतील कर्मचारीवृंद मोलाचे सहकार्य करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज,रविवार ३१ मे रोजी मोठी कारवाई करत एका तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ किलो ५०० ग्रॅम...

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!