Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीजगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा.. - जास्तीत जास्त...

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा.. – जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते.या स्पर्धेत २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची सुवर्णसंधी मिळते.आगामी ४८ वी जागतिक कौशल्य स्पर्धा चीनमधील शांघाय येथे येत्या,२२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.यासाठी देशपातळीपर्यंतची निवड प्रक्रिया जिल्हा,विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पार पडणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांची नावे थेट जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI),पॉलिटेक्निक कॉलेज,कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्यवसाय प्रशिक्षण संस्था,फाईन आर्ट्स कॉलेज तसेच विविध महाविद्यालयांतील इच्छुक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.इच्छुकांनी https:/skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन Learner / Participant या पर्यायाद्वारे आपली नोंदणी करावी.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!