Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरदुसरे राष्ट्रीय जयभीम संमेलन चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात... -देशभरातील विविध मान्यवर...

दुसरे राष्ट्रीय जयभीम संमेलन चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात… -देशभरातील विविध मान्यवर एकाच मंचावर राहणार उपस्थित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था चंद्रपूर व जयभीम संमेलन समिती चंद्रपूरच्या वतीने ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम संमेलन चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारिक,लोककलावंत,जलसाकार, नाटककार, वक्ते, मंत्री, खासदार, आमदार, चळवळीतील कार्यकर्ते, नेते, कवी तसेच आयएएस अधिकारी असे वेगवेगळ्या विषयांचे स्कॉलर्स एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने बौद्धिक मेजवानीचा अनोखा मेळा चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवार, ३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे तर उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, विशेष मार्गदर्शक म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजेंद्रपाल गौतम, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार बळवंत वानखेडे, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सुभाष धोटे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक अनिरुद्ध वनकर यांनी दिली.
शनिवार,३१ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळ्ळ्यानंतर रात्री ८ वाजता जयभीम कवी संमेलन,रात्री ८:४५ वाजता जयभीम आंबेडकरवादी जलसा सादरकर्ता गायिका सुषमा देवी (कुंकू लावीलं रमानं फेम), गायक रविराज भद्रे,धम्मजीत तिगोटे जलसा सादर करणार आहेत.रविवार, १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जयभीम विद्रोही गिते: राहुल सूर्यवंशी, निशा धोंगळे,सायं.६.३० वाजता भारतीय लोकशाही जपण्यासाठी निवडणूक आयोग,मीडिया व मतदारांची भूमिका’ यावर जयभीम परिसंवाद,रात्री ७.१५ वाजता ‘व्हय मी सावित्री बोलतेय’ एकपात्री नाटक, रात्री ७.३० वाजता जयभीम रत्न पुरस्कार व समारोपीय समारंभ.रात्री ९.१५ वाजता जयभीम बुद्ध भीम गीतांचा महाजलसा: सादरकर्ते गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे कडूबाई खरात, मंजुश्री शिंदे यांचा असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!