Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजवाढदिवस विशेष...मनोजभाऊ ढोरे सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस....

वाढदिवस विशेष…मनोजभाऊ ढोरे सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जीवनात कधी काय घडेल व कोण कुठे जाऊन पोहचेल; याचा काही नेम नाही.आयुष्य हे नश्वर आहे; त्याचा योग्यवेळी,योग्य ठिकाणी,योग्य निर्णय घेतल्यास यश हे आपोआपच पदरी पडत असते; यात कसलीही शंकाच नाही. आयुष्य जगत असतांना अनेक कठीण प्रसंग सर्वांवरच ओढवत असतात. जीवनात कधी सुख तर कधी दुःख ही नित्याचीच बाब आहे.कठीण प्रसंगावर जो मात करतो तोच खरा कार्यकर्ता ठरतो.आज,२५ ऑगस्ट २०२४ ला महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोजभाऊ ढोरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
मनोजभाऊ ढोरे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक होतकरू,मनमिळावू,शांत स्वभावाचे,मृदभाषि व्यक्तिमत्त्वाचे,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे काँग्रेसचे युवानेते म्हणून त्यांची ओळख आहे.अशातच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर खंदे समर्थकही आहेत.मनोजभाऊ ढोरे यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड होती.कार्य करीत असतांना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.अशातही त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.एक दिवस उजळला व त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये करण्यास मोलाची भूमिका बजावली; युवा वर्ग,शालेय विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,गोर-गरीब, शासकीय,खासगी प्रकरणांची प्रश्ने मार्गी लावणे, एखाद्याला मदत करणे, एखाद्यासाठी धाऊन जाणे अशा अनेक प्रकारची कार्ये त्यांनी आजवरती पार पाडली.अशातच मोलाची भूमिका बजावत असतांना अनेक विरोधकांनी ट्यांट मारणे,गालबोट ठेवणे, किल्ली उडवणे; अशा अनेक नानाविध प्रकारचे प्रयोग मनोजभाऊ ढोरे यांच्यावर आजमावून पाहिलेत; मात्र,तरीही त्यांनी खचून न जाता तन-मन-धनाने आपले कार्य करीत राहून अनेकांच्या नाकावर लिंबू टिच्चून उंच भरारी घेत सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपदी झेप घेतली. आजही त्यांनी सर्व समाजातील लोकांप्रती  आस्था कायम राखली आहे.सार्वजनिक कार्यक्रमात ते हिरीहिरीने भाग घेत असतात.कुठलाही मंडळ असो वा एखादा गरजू कुटुंब असो त्यांना मदतीचा हातभार लावण्यास महत्वाची भूमिका मनोजभाऊ बजावतांना  दिसून येतात.
संदेश- मनोज भाऊ ढोरे,महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस👇
आयुष्य हे नश्वर आहे; त्याचा योग्यवेळी,योग्य ठिकाणी,योग्य निर्णय घेतल्यास यश हे आपोआपच पदरी पडत असते; यात कसलीही शंकाच नाही. आयुष्य जगत असतांना अनेक कठीण प्रसंग सर्वांवरच ओढवत असतात.जीवनात कधी सुख तर कधी दुःख ही नित्याचीच बाब आहे.कठीण प्रसंगावर जो मात करतो; तोच खरा कार्यकर्ता ठरतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!