Monday, September 7, 2026
Homeकुरखेडापैश्याचा वाद विकोपाला गेला अन् तरुणीला 'त्याने' खतमच केला... - कुरखेडा शहरातील...

पैश्याचा वाद विकोपाला गेला अन् तरुणीला ‘त्याने’ खतमच केला… – कुरखेडा शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील २८ वर्षीय तरुणाची मोबाईलच्या क्षुल्लक कारणावरून तिघा मित्रांनी मिळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी,९ ऑगस्ट २०२४ रोजी उघडकीस आली होती.सदरची घटना ताजी असतांनाच परत काल,शनिवारी २४ ऑगस्टला सकाळी कुरखेडा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने कुरखेडा शहरात  एकच खळबळ उडाली.ज्योती ऊर्फ चांदनी मसाजी मेश्राम वय २६ वर्षे असे मृत तरुणीचे नाव आहे.
काल,शनिवारी सकाळच्या सुमारास काही युवक स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेले असता त्यांना शाळेच्या भिंतीलगत तरुणीचा मृतदेह आढळून आला.सदर वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, ठाणेदार महेंद्र वाघ यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.पंचनाम्यानंतर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. युवतीच्या शरीरावर जखमेच्या कुठल्याही खुणा आढळल्या नव्हत्या.रुग्णालयात शवविच्छेदन केल्याने तरुणीचा मृत्यू गळा दाबून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान,पोलिसांनी तातडीने तपासचक्रे गतीमान  केले व याप्रकरणी कुरखेडा शहरतीलच इकराम सलाम शेख वय ३६ वर्षे याला पोलिसांनी जेरबंद केले.
जुन्या पैशाच्या वादातून इकराम सलाम शेख याने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!