भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळावरील जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवारी १६ मार्चला सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात घडली.मीना ओमेश्वर कळू वय ३३ वर्षे रा.चिखला ता. तुमसर,जि.भंडारा असे मृत महिलेचे नाव आहे. माहितीनुसार,ओमेश्वर कळू हा पत्नी आणि दोन लहान मुलींसोबत दुचाकीने आपल्या स्वगावी चिखला येथे जात होता.गावी जात असतांना वाहनी गावात सिहोराकडून बस येत होती.बस येत असल्याने ओमेश्वर कळूने आपले दुचाकी क्रमांक- एमएच ३६ ए ४०१ हे रस्त्याच्या कडेला उतरवली.रस्त्याच्या कडेला उतरवताच रस्त्यावर शेण पडलेला असल्याने दुचाकी स्लीप झाली.दुचाकी स्लीप होताच तितक्यातच बस आली.त्यामुळे ओमेश्वर व दोन मुले रस्त्याच्या डाव्या बाजुला पडले.तर मीना ही उजव्या बाजुला पडल्याने बसच्या चाकाखाली आली.बसचे चाक महिलेच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती सिहोरा पोलिस प्रशासनास होताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला व ओमेश्वर कळू यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलीस प्रशासन करीत आहे.
दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक