Friday, July 31, 2026
Homeचंद्रपूरदारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले आहेत. एखादेवेळी डोक्याच्यावर गेले तर अनुचित प्रकार घडत असतो.असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील येसगाव येथे काल,सोमवारी २१ एप्रिलच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईला मारहाण सुरु केल्याने वडील आडवे गेले असता त्यांनाही मारहाण केली असता,वडीलाने स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उभारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला.यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला.३५ वर्षीय चंद्रशेखर नागेंद्र वाढई,रा.येसगाव,ता.मूल,जि.चंद्रपूर असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी आरोपी वडील नागेंद्र पांडुरंग वाढई वय ६५ वर्षे याला अटक केली आहे.
नागेंद्र वाढई यांना तीन मुले आहे.एकाचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला.एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाला तर अविवाहित मुलगा चंद्रशेखर व मृत मुलाचे दोन लहान मुल नागेंद्र सोबत राहतात.चंद्रशेखरला दारूचे व्यसन जडले.त्यामुळे दररोज भांडण करीत आई-वडीलांना मारहाण करायचा.काल सोमवारी आई भेजगाव येथे आठवडी बाजार करून परत आल्यानंतर दारूच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आईसोबत भांडण करून मारहाण केली.घर पेटवून देण्याची धमकीही देत होता.दरम्यान वडील नागेंद्र वाढई आले. चंद्रशेखरला समजावण्याचा प्रयत्न केला.त्याने वडीलांनाही मारहाण सुरु केली.जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार करताच तो जागीच गतप्राण झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!