Thursday, July 30, 2026
Homeनागपूरवाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण जाहीर केले आहे.त्यानुसार वाळू घाटाचे पूर्वीप्रमाणेच लिलाव केले जातील.नव्या धोरणात ६०० रुपये ब्रास हा शासन दर असला तरी लिलावात नेमकी किती बोली लागते. त्यानुसार इतर सर्व गोष्टी विचारात घेऊनच रेतीचे दर ठरवले जातील.काही ठिकाणी पर्यावरण मंजुरी नसल्याने वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे नवीन धोरणाप्रमाणे रेतीच्या दरासाठी वाट पाहावी लागणार आहे.जोपर्यंत पर्यावरणाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत वाळूचे उत्खनन करता येत नाही. परिणामी लिलावही करता येत नाही.काही ठिकाणी वाळू डेपोतील वजन काट्यात भांजी मारली जात आहे.नियमानुसार वाळूचे उत्खनन केल्या जात नाही,अश्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!