Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीअखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. - मजुरीचे बाराशे कोटी रुपये...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजुरांनी पोट कशाने भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निर्दयी सरकारने मजुरांची मजुरी तात्काळ अदा करावी, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला होता.अशातच आता रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी नुकतीच चर्चा झालेली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असल्याने सदरचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यातील थकीत मजुरी लवकरच मजुरांच्या खात्यात जमा होणार आहे.योजना राबवत असतांना कामाविषयी तक्रारी होत असतात,परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत,असेही मंत्री गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!