Thursday, July 30, 2026
Homeगडचिरोली३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी अर्ज आमंत्रित...

३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी अर्ज आमंत्रित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात आधार नोंदणी आणि बायोमेट्रीक अद्ययावतीकरण सेवांचा विस्तार करण्यासाठी,विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात आधार सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने,माहिती तंत्रज्ञान संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहेत.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) चालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.आधार नोंदणी सेवा केंद्रांसाठी जाहीरात, रिक्त ३१ महसूल मंडळ क्षेत्रांची यादी आणि अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर (www.gadchiroli.gov.in) उपलब्ध आहे.इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी १८ एप्रिल ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत,सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!