- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-कधी वाघाचा हल्ला तर कधी रस्त्यावरून ये -जा करतांना बिबट्याचा हल्ला,यामुळे गाव परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.अशातच काल,शुक्रवारी १० जानेवारीच्या भर दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना नागभिड तालुक्यातील पारडी ठवरे येथे घडली.गुरुदेव पुरुषोत्तम सारये वय ४५ वर्षे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
गुरुदेव काल, शुक्रवारी तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी शेतावर गेला होता.तो तुरीच्या शेंगा तोडून परत येत असतांना अचानक वाघाने हल्ला चढवला.हल्ला चवताच गुरुदेवने आरडाओरड केली.आरडाओरड करताच शेत शिवारातील आजूबाजूचे शेतकरी धावून गेले.शेतकरी धावून आल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.हल्ल्यात गुरुदेवला गंभीर जखम झाल्याने उपचाराकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर ब्रम्हपुरीला हलविण्यात आले. सदर घटनेचा वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.परिसरात वाघाचे हल्ले होत असल्याने नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
- Advertisement -

