- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ दिनांक- १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.त्यानुसार विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करून रस्ते सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात येत आहे.अश्याच एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की,वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कितीही दंड ठोठावला,कितीही कडक कायदे केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत.हेल्मेट न घातल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे आहे.लोकांची मानसिकता बदलत नाही; तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही.शासकीय वाहनांमध्ये देखील नियम पाळले जात नाहीत.अनेकदा मी दंड वाढवला म्हणून नाराजी पत्करली.मात्र,शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहेत; असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज,शनिवार ११ जानेवारीला सडक सुरक्षा अभियानांतर्गत वनामती येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली.प्रसंगी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, ‘कोरोनामध्ये, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंगलीमध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल,तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते.या देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील.पण लोकांना शिस्त नसेल,तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही.सिग्नल तोडणे,लेन तोडून निघून जाणे,मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे,हेल्मेट न लावणे,सिटबेल्ट न बांधणे,अशा कितीतरी चुका लोकं करतात.आपली आई,पत्नी,मुले घरी वाट बघत असतील,हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी.कारण वर्षभरात होणाऱ्या अपघतांमध्ये जे मृत्यू होतात,त्यात १८ ते ३४ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे.एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो,तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही; अशा भावनाही गडकरी यांनी व्यक्त केल्या.
- Advertisement -

