Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरताडोबाकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाची बसला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

ताडोबाकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाची बसला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर-तळोधी मार्गावरील अडेगाव फाटा ते सारंगड मार्गावर ताडोबाकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाने चिमूर आगाराच्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली,यामुळे बस पलटी होता-होता थोडक्यात बचावली.त्यातच  पर्यटकांचे झायलो चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरून बंद पडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. जीवितहानी तर टळली,मात्र बस आणि झायलोचे मोठे नुकसान झाले आहे.
झायलो या चारचाकी वाहनाने चार पर्यटक नागपूरहून चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे निघाले होते.तर एमएच ४०-एन ९५१३ क्रमांकाची चिमूर आगाराची बस तळोधीवरून अडेगाव फाटा ते सारंगड मार्गाने परत येत असतांनाच सदरचा अपघात घडला. झायलो वाहन चालत्या बसला मागून धडकल्याने धडाम असा आवाज झाला.यामुळे बस चालक गोंधळला आणि प्रवाशी घाबरले.बस झाडाला जाऊन धडकली आणि जाग्यावरच थांबली.सुदैवाने बस मधील प्रवाशी व चारचाकी वाहनातील पर्यटक थोडक्यात बचावले.घटना घडताच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केल्याने तब्बल अर्धा तास मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.लागलीच घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तळोधी,भिसी व चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून झायलो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!