उद्रेक न्युज वृत्त
दिल्ली :- कानपूरच्या काही सुशिक्षित मुलांनी अशी शक्कल लढवली की यावर कुणाचाही विश्वास बसूच शकत नाही.पैशाच्या हव्यासापोटी तरुणांनी थेट आपल्या घरातच नोटा छापायला सुरुवात केली.जेव्हा गरज असले तेव्हा घरात ठेवलेल्या मशीनमधून नोट प्रिंट करायची आणि ती वापरायची; असा खेळ तिन्ही मुलांचा सुरू होता.एकाने पीएचडी तर दोघांनी बी.टेक केल्याची माहिती आहे.सौरभ सिंग,विमल सिंग अशी दोन मित्रांची नाव असून त्यांच्यासोबत आणखी एक मित्र होता.
सुरुवातीला तिघांनी मिळून नोटा छापायची मशीन तयार केली.मशीन तयार करून त्यांनी ठरवले की २००० हजाराची नोट छापायचीच नाही.कारण ही नोट छापली तर आपला भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट न छापता १००,२०० व ५०० च्या नोटा छापायच्या व इतरत्र खर्च करायचे.जेव्हा पैश्याची अडचण पडली की मशीन चालू व हातात नोटा; असा नित्याचा नियम चालवला होता.मात्र चोर कितीही चोऱ्या करीत असला तरी एक ना एक दिवस सापडतोच.अशीच कानकुन शेजाऱ्यांना लागताच; त्यांनी पोलिसांना कळविले.अखेर पोलिसांनी कट रचून घरावर छापा टाकला.घरात जाताच सगळेच हादरले. पोलिसांनी तिन्ही मुलांकडून एकूण ४ लाख ६७ हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत.तिघांनी युट्यूबच्या माध्यमातून नोटा छापण्याचे काम शिकले होते.यामध्ये त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत नोटा छापण्याची मशीन तयार केली आणि हा गुन्हेगारीचा मार्ग निवडला.अखेर या प्रकरणी पोलिसांना तिघांनाही अटक केली असून मशिनही ताब्यात घेतली आहे.यामध्ये त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत नोटा छापण्याची मशीन तयार केली आणि हा गुन्हेगारीचा मार्ग निवडला.अखेर या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून मशिनही ताब्यात घेतली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.