- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शंकरपट पाहून स्वगावी परतणाऱ्या एका ३५ वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील शंकरपट पाहून दुचाकी क्रमांक एमएच ३५/जे-६८६ हिने आपल्या गावी जात असतांना जांभळी मार्गावर अचानकपणे दुचाकी अनियंत्रित होऊन खाली कोसळला.खाली कोसळताच तितक्यातच मागेहून भरधाव वेगाने अज्ञात ट्रक आला.अशातच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच ठार झाला.प्रमोद जैराम कापगते वय ३५ वर्षे रा.कटंगधरा/सासरा असे अज्ञात ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.घटना घडताच अज्ञात ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला.प्रकरणी साकोली पोलिसांची पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.प्रमोद हा साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मजुरीचे काम करीत होता.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

