- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या उराडी गावा नजिक असलेल्या कुथे पाटील हायस्कूल जवळ ट्रॅक्टर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन घटनास्थळावरच दोघे ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार १४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे वय ३० वर्षे रा.तूलतूली ता. आरमोरी व दुचाकीस्वार महेंद्र दूगा वय ३० रा. काकडयेली (दूधमाळा) ता.धानोरा असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार,गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक-एमएच ३३ एफ ३२८० याने ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे नजीकच्या सोंसरी डोंगर पहाडिवरील दगड(गौण खनिज)वाहतूक करून जात होता.तर विरुद्ध दिशेने दुचाकीने दोघेजण येत असतांना दुचाकी क्रमांक-एमएच ३३ वाय ५४५३ यांची समोरासमोर जोरदार धडक बसली.धडक बसताच ट्रॅक्टर पलटी होत असतांना रोहीत नरोटे हा ट्रॅक्टर इंजन वरुन उडी मारायला गेला.उडी मारत असतांना ट्राली मधील मोठे दगड ट्रॅक्टर चालकाला लागल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यु झाला तर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचाही जागीच मृत्यु झाला.तर यात दुचाकीवरील एकजण जखमी झाला.मात्र,जखमी इसमाचे नाव कळू शकले नाही.
- Advertisement -