- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-‘निर्धार परीवर्तनाचा,संकल्प नवनिर्मितीचा’ या संकल्पनेतून महाविकास आघाडीचे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथे उद्या,शुक्रवार दिनांक-१५ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत.उद्याला कुरुड येथील झुरे मोहल्ला गांधी पुतळ्याच्या बाजूला सकाळी ११:३० वाजता पटोले यांची तोफ धडाडणार असल्याने महाविकास आघाडीचे सर्व नेते,पदाधिकारी, कार्यकर्तें व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

