Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोलीप्रचारातून ५०० रुपये मजुरी मिळत असतांना दिवसभर शेतात कां राबायचे? - निवडणुकीपर्यंत...

प्रचारातून ५०० रुपये मजुरी मिळत असतांना दिवसभर शेतात कां राबायचे? – निवडणुकीपर्यंत तरी कमवून घेऊ; मग तर शेतात राबणेच आहे नं..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असून प्रचारासाठी गावागावाहून महिला, पुरुषांना ५०० रुपये मजुरी,दिवसभर गावातून भ्रमंती आणि सोबत पोटभर जेवण मिळत असल्याने या मजुरांनी धान कापणीसह इतर कामांकडे
पाठ फिरविली आहे.परिणामी,बऱ्याच पैकी शेतातील धान उभा असून मजुरांसाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे.प्रचारातून ५०० रुपये मजुरी मिळत असतांना दिवसभर शेतात का राबायचे,असा सूर या मजुरांमधून उमटू लागला आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्ते असतात.पण गर्दी वाढवून दाखविण्यासाठी तीनही मतदारसंघातील गावागावाहून महिला,पुरुषांना मजुरीवर आणले जात आहे.या मजुरांना ५०० रुपये मजुरी दिली जाते.दिवसभर वाहनांतून,दारोदारी प्रचार केल्यानंतर संध्याकाळनंतर जेवनही दिले जात असल्याने मजुरांनी निवडणुकीपर्यंततरी कमवून घेऊ, मग तर शेतात राबणेच आहे; असा निश्चय केलेला आहे.
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे.दरवर्षी धान कापणीसाठी गावोगावी महिला मजुरांची जुळवाजुळव करावी लागते.एखाद्या व्यक्तीकडे महिला मजुरांना एकत्र गोळा करण्याची,त्यांची मजुरी ठरवून देण्याची जबाबदारी दिली असते.महिलांची जुळवाजुळव झाल्यानंतर धान कापणी होईपर्यंत मजूर शेतात राबत असतात.धान कापणीसाठी मजुरांना अडीचशे ते ४०० रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते.त्यात मजुरांची व्यवस्था करुन देणे याचीही कमिशन ठरली असते.परंतु,यावर्षी निवडणुका आल्याने उमेदवारांनी या मजुरांनाच प्रचारासाठी ठेवल्याने शेतीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.त्यामुळे अनेकांनी धान कापणीचे गुत्ते रद्द केले आहेत.मजुरांना विणवनी करुनही धान कापणीसाठी पाठ दाखवित आहेत.
धान कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी
हार्वेस्टर मशिन शोधणे सुरू केले.परंतु,एकाचवेळी हार्वेस्टरची मागणी वाढल्याने तेही मिळणे कठीण झाले आहे.हार्वेस्टरसाठी तारीख पे तारीख मिळत आहे.हार्वेस्टरऐवजी मजुरांकडून कापणी केल्याने धानाचे फार नुकसान होत नाही.परंतु,आता नाईलाजाने शेतकऱ्यांना हार्वेस्टरसाठी शोधाशोध करावी लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!