Sunday, September 20, 2026
Homeभंडाराटिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण..

टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-खापा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल,गुरुवारी २० मार्चच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील
काटेबाम्हणी येथील बस स्थानकासमोर घडली. टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण झाला.मृताचे नाव सचिन मधुकर बालपांडे वय ३७, रा.दाभा-कोथूर्णा भंडारा असे आहे. अपघातात टिप्पर दुचाकीवरून गेल्याने गाडीसह युवकाचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला.अपघात घडताच अज्ञात टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिकांनी वाहनाचा पाठलाग केला मात्र तो गवसला नाही.मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिन रामटेक मार्गे खापा करीता आपल्याच बाजूने दुचाकी क्रमांक- एम एच- ३६ आर-८३५८ ने निघाला होता.दरम्यान विरुद्ध दिशेने रामटेक धावणाऱ्या टिप्परने त्याला गाव शिवारातील हलक्या वळण मार्गावर धडक दिली. गावच्या मुख्य चौकात उपस्थितांनी घटना आपल्या डोळ्यांनी बघितली.अशातच अज्ञात टिप्पर नागरिकांनी पाठलाग केला असता पाठलाग करणाऱ्यांना टिप्पर गवसले नाही.मात्र घटनेची माहिती पोलिसांना देऊनही तब्बल ४० मिनिटे लोटूनही यंत्रणेने घटनास्थळ गाठले नसल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!