Tuesday, April 28, 2026
Homeआरमोरीजे काम नगर परिषदेने करायला पाहिजे; ते शिवसैनिकांनी करून दाखवले.. - आरमोरी...

जे काम नगर परिषदेने करायला पाहिजे; ते शिवसैनिकांनी करून दाखवले.. – आरमोरी शहरातील व्यथा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या  आरमोरी शहरात एक आश्चर्यचकित करणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,जे काम नगर परिषदेने करायला पाहिजे होते,असे काम शिवसैनिकांनी करून दाखविल्याने आरमोरी स्थित नागरिकांनी शिवसैनिकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.तर आरमोरी नगर परिषदेच्या  कारभारावर रोष व्यक्त केले आहे.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे आवागमन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाश्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.शहरात मुख्य रस्त्यांवर तसेच इतरत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून छोटे-मोठे अपघात घडत होते.ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.शहरातील समस्या दूर करण्यासाठी नगर प्रशासन पुढे धजावत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे गड़चिरोली लोकसभा प्रमुख धनंजय गहेरवार,युवासेना विधानसभा संघटक नारायण धकाते,गडचिरोली जिल्हा समन्वयक राकेश बैस, शिवसेना शहर अश्विन तितिरमारे सह आरमोरी शहरातील शिवसैनिकांच्या वतीने आरमोरी शहरातील जुने बस स्थानक,नविन बस स्थानक व देसाईगंज (वडसा)रोड टी पॉईंट या प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले.जे काम नगर प्रशासनास जमले नाही,असे काम शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केल्याने शिवसैनिकांच्या या स्तुत्य उपक्रमाची  शहरवासियांकडून प्रशंसा केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!