- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबई व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम,राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय सावली यांच्या संयुक्त समन्वयाने जागतिक कुष्ठरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय सावली यांच्या वतीने कवठी येथे “राष्ट्रीय सेवा योजना”(NSS) शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने “जागतिक कुष्ठरोग दिन” नुकताच साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयीची शास्त्रीय माहिती देण्यात आली.त्यानंतर,विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर कुष्ठरोगाची लक्षणें,कुष्ठांतेयाचे अधिकार याबाबतची माहिती लिहुन कुष्ठांतेयासोबत कसलाही भेदभाव न करता सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा संदेश पत्रकाद्वारे उपस्थितांना देण्यात आला. तसेच चौका-चौकात फ्लिपचार्ट व बॅनर प्रदर्शनीच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.प्रसंगी गावातील प्रत्येक कुटुंबीयांना विद्यार्थ्यांच्या मार्फत शास्त्रीय माहिती देऊन तपासणी करण्यात आली व सर्वेक्षण दरम्यान संशयीतांची तपासणी करून रुग्णांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भीत करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर.एम.वासेकर,प्रा.देवीलाल वसाके,प्रा.राजश्री मारखंडीवार,प्रा.प्रफुल वैराडे,आरोग्य विभागाचे प्यारा मेडिकल वर्कर प्रशांत बाबनवाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती वनकर,आरोग्य सेविका मंगला पैकराव,जया मैदाळकर,आशा वर्कर संगीता गेडाम,प्रेमीला भोयर, सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबईचे मिलिंद बारसींगे,सपना कंकडालवार,राकेश गडमवार, क्रिष्णा निकुरे,लता तुनकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -

