Thursday, May 28, 2026
Homeभंडाराचालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटून व्हॅन रस्त्याच्या खाली कोसळली; चालकासह विद्यार्थी जखमी..

चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटून व्हॅन रस्त्याच्या खाली कोसळली; चालकासह विद्यार्थी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुलव्हॅनचा अपघात घडल्याची घटना आज,गुरुवार १६ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास भंडारा तालुक्यातील खमारी मार्गावरील सुरेवाडा पुलाजवळ घडली.सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अपघातात चालकासह विद्यार्थी जखमी झाले.२५ वर्षीय चालक उमेश मेश्राम रा.मांडवी,५ वर्षीय अवनेश भोयर रा.माटोरा,गर्ग मेश्राम रा.माटोरा,उर्वेश बेदरकर,सान्वी बेदरकर,रुद्रानी बेदरकर रा.मांडवी, सानिध्या चोपकर रा.खमारी अशी जखमिंची नावे असून घटना घडताच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली होती.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कारधा पोलिस ठाण्याचे पथक  घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठाच्या रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्कुलव्हॅन चालक उमेश मेश्राम हा नेहमी प्रमाणे आज गुरुवारी कारधा शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुलव्हॅनमध्ये बसवून निघाला होता.प्रसंगी खमारी मार्गावरील सुरेवाडा पुलाजवळ येताच मार्गावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून वाट काढतांना चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या खाली जाऊन पलटली.अपघातात चालकासह विद्यार्थी जखमी झाले.मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!