Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरचक्क मुख्य मार्गावरच वाघाचा ठिय्या; वाहने थांबली जाग्यावरच..

चक्क मुख्य मार्गावरच वाघाचा ठिय्या; वाहने थांबली जाग्यावरच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर-मुल या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-९३० वरील अगडी फायरलाईन परिसरात आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास चक्क मुख्य मार्गावरच वाघाने ठिय्या मांडल्याने चंद्रपूरहून मुलकडे आणि मुलकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहने जाग्यावरच थांबली.वाघ रस्त्याच्या मधोमध शांतपणे बसलेला असतांनाच अनेक वाहनचालक आणि पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून दर्शन घेतले.सदरचा परिसर हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागूनच असल्याने परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचे दर्शन होत असते.वाघाने ठिय्या मांडल्याने तब्बल अर्धा तास महामार्गावरील वाहतूक बंद होती.
चंद्रपूर-मुल या महामार्गावरील आगडी फायरलाईन येथे “मामा मेल” या प्रसिद्ध वाघाने या भागात दोन बैलांची शिकार केली होती.त्यामुळे त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ वावर होता.मामा मेल हा अतिशय धीट वाघ असून वाहने आणि माणसांच्या उपस्थितीची पर्वा न करता मुक्तसंचार करतो.त्यामुळे त्याने दुपारच्या सुमारास महामार्गावर ठिय्या केल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती.वन विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.वन कर्मचाऱ्यांनी वाहने आणि वाघ यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून,रस्त्यावर लोकांची अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेतली.वाघाला हुसकावून न लावता,तो स्वतःहून कधी पुन्हा जंगलात जातो,यासाठी वेळ घेतला.साधारण अर्धा तास शांतपणे बसल्यानंतर ‘मामा मेल’ वाघ स्वतःच्या मर्जीने रस्त्यावरून उठून जंगलाच्या दिशेने निघून गेला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!