- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैध रेतीची वाहतूक करीत असतांना महसूल विभागाने टिप्पर पकडुन तहसील कार्यालयात जमा केला.अशातच पकडलेला टिप्पर अर्ध्या रात्री पळविल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तहसील कार्यालयात घडली.प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात टिप्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकळी येथील किशोर ठवकर यांच्या मालकीचा टिप्पर क्रमांक-एम.एच ४० बि एल ९३८८ हा १६ जुलै २०२४ रोजी विनापरवाना पाच ब्रास रेती वाहून नेतांना पकडले.अशातच २८ एप्रिल रोजी रात्री २ च्या सुमारास दोन टिप्परच्या मधात उभा असलेल्या टिप्परमधील रेती तिथेच टाकून रिकामा टिप्पर पळवून नेला.त्यावेळी रात्र पाळीत तहसील कार्यालयात कर्तव्यावर असलेले दोन कोतवाल राकेश ठवकर व सुनील गायधने यांच्या लक्षात आले.शोधाशोध केली परंतु टिप्परचा शोध लागला नाही. त्यामुळे मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली असुन पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करून पुढील तपास करीत आहेत.ट्रक घेऊन पळण्याचा सल्ला देणारा व सहकार्य करणारा मास्टरमाईंड तहसीलमधीलच असेल,अशी चर्चा सुरू झाली आहे.
- Advertisement -

