Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीभविष्यात गडचिरोली जिल्हा आघाडी जिल्ह्यांच्या बरोबरीने सरासरी गाठेल.. - आज महाराष्ट्र दिनी...

भविष्यात गडचिरोली जिल्हा आघाडी जिल्ह्यांच्या बरोबरीने सरासरी गाठेल.. – आज महाराष्ट्र दिनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-“सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,” अशी ग्वाही राज्याचे वित्त,नियोजन, कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आज,गुरुवार १ मे  महाराष्ट्र दिनी दिली.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना ॲड.जयस्वाल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत घरकुल योजनांत भरीव प्रगती झाली आहे.प्रधानमंत्री आवास योजना,पी.एम. जनमन,मोदी आवास,रमाई,शबरी व आदिम आवास योजनांमधून शासन सामान्य माणसाच्या घरकुलांचे स्वप्न शासन पूर्ण करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, प्रशासन अधिक गतिमान व नागरिकाभिमुख होण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री विशेष लक्ष देत आहेत आणि भविष्यात गडचिरोली जिल्हा इतर आघाडीच्या जिल्ह्यांच्या बरोबरीने सरासरी गाठेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव सहपालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!