उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शहरात काल २५ फेब्रुवारी ला संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी; यासाठी तृतीपंथीयांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.तृतीयपंथीयांनी मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’, ‘प्रेम हे प्रेम असते’ अशा प्रकारे शहरातील मुख्य मार्गांवरून हातात फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तृतीयपंथीयांनासुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.त्यांनासुद्धा प्रेम करण्याचा,विवाह करण्याचा अधिकार आहे. हैदराबादमध्ये एक तृतीयपंथी जोडपे बाळास जन्म देणार आहे.त्यामुळे समाजाचा तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा,असे आवाहन मिरवणुकीच्या माध्यमाद्वारे करण्यात आले आहे.