Saturday, August 8, 2026
Homeगोंदियाअन् शेतकऱ्याच्या खात्यातून १ लाखाच्यावर रक्कम झाली गायब...- लिंक उघडली आणि सांगितली...

अन् शेतकऱ्याच्या खात्यातून १ लाखाच्यावर रक्कम झाली गायब…- लिंक उघडली आणि सांगितली होती ओटीपी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया (नवेगावबांध) :- क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडींग करावयाचे असल्याने पाठविलेल्या लिंकमधील ओटीपी सांगण्याचा बहाणा करून खात्यातून एक लाख ९३ हजार ३८० रुपये अन्य खात्यात ट्रान्सफर करण्यात आली असल्याची घटना बुधवारी २२ फेब्रुवारी ला घडली.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील शेतकरी भास्कर सुखदेव बाळबुद्धे वय ४० वर्षे यांना बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी त्यांना मोबाइल क्रमांकावर कॉल आला व ॲक्सिस बँक येथून बोलतो,तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडींग करायचे आहे काय? असे विचारण्यात आले.यावर बाळबुद्धे यांनी होकार दिला असता समोरील व्यक्तीने त्यांना मोबाइलमधील ॲक्सिस बँकेचे ॲप सुरू करा,असे सांगितले. त्यानुसार,बाळबुद्धे यांनी ॲक्सिस बँकेचे ॲप सुरू केले व मला काही समजत नाही.असे त्या व्यक्तीला सांगितले.यावर त्या व्यक्तीने,एक लिंक पाठवित असून, त्यावर ती लिंक ओपन करून सांगा असे बोलून एक साधा मेसेज पाठवला.ती लिंक उघडली असता त्यावर एक ओटीपी आला आणि लगेच बाळबुद्धे यांच्या खात्यातून एकदा ४९ हजार ७९३ रुपये व दुसऱ्यांदा एक लाख ४३ हजार ५८७ रुपये असे एकूण एक लाख ९३ हजार ३८० रुपये खात्यातून कमी झाले.सदर प्रकार लक्षात येताच आपली फसवणूक झाली असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येतच,त्यांनी जिल्हा सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!