Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीसावधान....! व्हॉट्स ॲप मॅसेज ऑफरच्या नावाखाली चोरला जातो डाटा...- अदाणी,अंबानी व इतर...

सावधान….! व्हॉट्स ॲप मॅसेज ऑफरच्या नावाखाली चोरला जातो डाटा…- अदाणी,अंबानी व इतर व्यक्तींची नावे केली जातात समोर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

गडचिरोली :- हल्ली काही युवकांना व सुजाण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऑफरच्या नावाखाली व्हॉट्स ॲप वरती लिंक वा मॅसेज पाठविला जातो आहे.त्यामध्ये अदाणी,अंबानी व इतर व्यक्तींनी एवढा इंटरनेट डाटा वा आपणांस कार,दुचाकी वाहन लागली आहे.सदर मॅसेज १० गृप वरती पाठवा व बक्षीस मिळवा.असे प्रलोभन दाखवून बळी पाडले जात असल्याने अशा फुकटच्या प्रलोभनास बळी पडू नये; अन्यथा महागात पडणार आहे.

मोठ्या व्यक्ती आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी व्हॉट्स ॲपवर सक्रिय झाली असून,या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे.केवळ मोबाइल डेटा मिळविणे आणि युजरची संख्या वाढविण्यासाठी असे प्रयोग होत असल्याचे समोर येत आहे.पाठविलेला मॅसेज एकाकडून १० व्यक्तींकडे आणि १० व्यक्तींकडून हजारो व्यक्तींकडे पाठविले जात असल्याने आपली संपूर्ण माहिती समोरील व्यक्ती चोरून व नंतर आपल्याशी संपर्क साधून चुना लावण्याचे काम करीत असतात.नंतर आपण म्हणतो की,आपली माहिती समोरील व्यक्तींकडे कशी गेली.फसव्या नेटवर्क जोडणीचे मॅसेज व्हॉट्स ॲप वर जाणीवपूर्वक पसरविले जात असून,अशांपासून अगोदरच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

पोलिस गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अशांवर पाळत ठेवून सदर फेक मॅसेज पाठविणाऱ्या जाळेचा शोध घेऊन यातील प्रमुख टोळीचा पर्दाफाश करावी; अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!