Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीअखेर फरार झालेल्या पतसंस्थेतील एजंटास पोलिसांनी केली अटक...- गडचिरोली येथील प्रकरण; ६७...

अखेर फरार झालेल्या पतसंस्थेतील एजंटास पोलिसांनी केली अटक…- गडचिरोली येथील प्रकरण; ६७ लाखांची रक्कम घेऊन झाला होता फरार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील एजंट मंगेश नरड याने नवेगाव येथील १० नागरिकांकडून राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून दैनंदिन ठेवीसह फिक्स डिपॉझिट म्हणून जवळपास ६७ लाखांची रक्कम गोळा केली.रक्कम तर गोळा केली; मात्र काही गुंतवणकादारांना पैशाची गरज पडली असता पतसंस्थेत काही नागरिक गेले व रकमेविषयी चौकशी केली.एजंटाने गोळा केलेल्या रकमेची पतसंस्थेत नोंदच नसल्याचे उघड झाल्याने सदर प्रकरण चव्हाट्यावर आला होता.

नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबंधितांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवीत अखेर एजंट मंगेश नरड यांस चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून २४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.नरड याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मंगेश नरड हा विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा दैनिक ठेवी गोळा करण्याबरोबरच तो पतसंस्थेचा व्यवस्थापक म्हणून काम सांभाळत होता.गेल्या अनेक वर्षापासून तो पतसंस्थेत काम करीत असल्याने खातेधारकांचा त्याने विश्वास संपादन केला होता.मात्र पैश्याच्या हव्यासापाई सर्वकाही गमावून बसला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!