Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूर'गावकरी ते राव न करी..!' 'हे कायची रोजची भानगड' म्हणत संतप्त नागरिकांनी...

‘गावकरी ते राव न करी..!’ ‘हे कायची रोजची भानगड’ म्हणत संतप्त नागरिकांनी चक्क ग्रामसेवकाला डांबले ग्रामपंचायतीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ग्रामपंचायत म्हटली की,गावातील नागरिकांचे प्रश्न आलेत.सर्वप्रथम गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.तुम्हाला आम्ही निवडून दिले.त्यामुळे तुम्ही काय करता,याच्याशी आमचे देणे- घेणे नाही.पण किमान गावातील सार्वजनिक हिताची तरी कामे तर करा.जसे की,नालीसफाई,पाणीपुरवठा, स्वच्छता,आरोग्य व इतर सार्वजनिक कामे यांना तर प्राधान्य द्या.समस्यांचे निराकरण न केल्यास कुणाचाही पारा चढणारच.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील बोर्डा (सूर्ला) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार समस्यांचा पाढा वाचला.पण,कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने ‘गावकरी ते राव न करी’ या म्हणी प्रमाणे संतप्त ग्रामस्थांनी ‘हे कायची रोजची भानगड’ म्हणत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास चक्क ग्रामपंचायतीत डांबल्याची घटना उघडकीस आली आहे.
बोर्डा(सूर्ला)ग्रामपंचायतीत काल सोमवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे गावकरी गावातील समस्या सोडविण्यात याव्यात,यासाठी ग्रामपंचायतीत गेले होते.पण,ऐनवेळी सरपंच,उपसरपंच व इतर पाच सदस्य गैरहजर असल्याने मासिक सभा तहकूब झाली.मासिक सभा तहकूब झाल्याचे ग्रामस्थांना कळताच उपस्थित सर्वांचा पारा चढला.त्यामुळे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांला विचारणा करून धारेवर धरले.अश्यातच ग्रामसेवकाची बोबडी वळली.संतप्त महिला-पुरुषांनी हे रोजचीच भानगड आहे,असे म्हणत ग्रामपंचायतीच्या आतमध्ये असलेल्या ग्रामसेवकाला कोंबून ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले.प्रसंगी उपस्थित ग्राम सदस्यांना सुद्धा गावकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले. ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामस्थांसह माजी सरपंचा ऐश्वर्या खामनकर,उमेश देशमुख,रवींद्र देसाई,आनंदराव वानखेडे,प्रतिमा कातकर,नंदा हिवरकर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!