Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरगळफास घेण्याच्या १५ दिवसांपूर्वीच प्रेमप्रकरणाची पोलिसांत तक्रार.. -आत्महत्या की हत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील...

गळफास घेण्याच्या १५ दिवसांपूर्वीच प्रेमप्रकरणाची पोलिसांत तक्रार.. -आत्महत्या की हत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील गळफास प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उचली गाव परिसरातील टॉवरला रविवारी २ मार्च रोजी गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय १४ वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय २५ वर्षे,रा.उचली, ता.ब्रम्हपुरी या प्रेमींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.अशातच आता आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली आहे.गायत्री व रोहित यांचे प्रेमप्रकरण बहरून येऊ लागले होते.त्यातच दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या आईला लागल्याने १५ दिवसाआधी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.पोलिसांनी दोन्ही प्रेमींना ठाण्यात बोलावून समजूत काढली होती. दरम्यान,तीन ते चार वेळा दोघांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.घटनेच्या आधी शुक्रवारी २८ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान दोघेही  घरून जंगलाच्या दिशेने निघून गेले होते.सदरची बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच,शनिवार १ मार्चला सकाळी पोलिसांत मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली होती.ही बाब गावातील काही नागरिकांच्या लक्षात आल्याने प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला.मात्र,दोन्ही प्रेमी रविवारी २ मार्चला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्या की हत्या?अशी कुजबुज गाव परिसरासह तालुक्यात सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!