Friday, June 5, 2026
Homeदेसाईगंजगडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीला लागले गालबोट…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील प्रकार….

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीला लागले गालबोट…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील प्रकार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील मतदान केंद्रावर एक अनोखा व विचित्र प्रकार मतदार लोकांच्या बाबतीत घडलेला आहे.सदरची घटना ही काल,दिनांक-१९ एप्रिल २०२४ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सकाळी ७ वाजेवापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार होती.मात्र अचानक देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील बूथ क्रमांक-१९४ यावर पहिल्यांदाच गालबोट लागल्याचे दुपारच्या सुमारास दिसून आले.सदर बूथ क्रमांकावर कार्यरत असणारे निवडणूक अधिकारी नाकाडे हे मतदारांना चक्क ईव्हीएम मशीनच्या वरच्या बटणावर म्हणजेच कमळावर बटन दाबून मतदान करावे; असे सांगू लागितल्याने काही जणांना याची माहिती होताच सर्वांची भंभेरी काहीकाळ उडाली.सदर घटनेची माहिती सर्वत्र पसरताच मतदार तसेच इतर कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवून वरिष्ठांना कळविण्यात आले व नाकाडे यांना तात्काळ त्या ठिकाणाहून हटविण्याची मागणी करण्यात आली.त्यानुसार झोनल अधिकारी सरदारे यांनी नाकाडे ऐवजी दुसऱ्या निवडणूक अधिकारी यांची तात्काळ नियुक्ती केली.त्यानंतर सदर प्रकरण काही काळ शांत तर झाले; मात्र आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी नाकाडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी अनेकांकडून जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नवीन रेल्वे लाईन कामाच्या दृष्टीने दोन दिवस मेमू पॅसेंजर गाड्या राहणार रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे येत्या,रविवार ७ जून...

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता...

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!