Friday, April 10, 2026
Homeदेसाईगंजगंभीर जखमी झालेल्या कोरेगावच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू.. - देसाईगंज तालुक्याच्या कसारी-कोरेगाव मार्गावर...

गंभीर जखमी झालेल्या कोरेगावच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू.. – देसाईगंज तालुक्याच्या कसारी-कोरेगाव मार्गावर झाला होता अपघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव येथील २७ वर्षीय देवेंद्र पुरुषोत्तम पुराम व १७ वर्षीय सुजल सुरेश आळे हे दोघेही दुचाकीने शनिवार १० मे रोजी कसारी येथे लग्नसमारंभ कार्यक्रमास गेले होते.लग्न समारंभ आटोपले व सायंकाळच्या सुमारास कोरेगाव येथे दुचाकीने जाण्यास निघाले.दुचाकीने जात असतांना कसारी- कोरगाव मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, देवेंद्र पुराम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.तर सुजल आळे हा गंभीर जखमी झाला होता.त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते.तीन दिवस उपचार सुरू असतांनाच काल मंगळवारी सुजल आळे याचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.सुजल हा कोरेगाव येथील किसान विद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता.लग्न सोहळा हा दोघांच्या मृत्यूस केवळ नाममात्र ठरल्याने गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!