Saturday, May 2, 2026
Homeगोंदियाखासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या मालकीच्या शाळेसमोरच राखीचे साम्राज्य... - ग्रामपंचायतीने राईस मिलर्सना...

खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या मालकीच्या शाळेसमोरच राखीचे साम्राज्य… – ग्रामपंचायतीने राईस मिलर्सना नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गोरेगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील राखेचा प्रश्न आता नागरिकांसाठी धोकादायक बनत चालला आहे.येथे किरसान इंटरनॅशनल स्कूलसमोरच राइस मीलमधून निघणाऱ्या राखेचा साठा करीत असून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात राख उडत आहे.दररोज शेकडो नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
एवढेच नव्हे तर किरसान इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तुमखेडा ग्रामपंचायतीने राइस मील मालकांना नोटीस बजावली.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.गोरेगाव तालुक्यातील गणखैरा गावाच्या हद्दीत किरसान इंटरनॅशनल स्कूलसमोर राइस मीलमधून निघणारी राख वर्षानुवर्षांपासून टाकण्यात येत आहे.त्यामुळे त्याठिकाणी राखेचे छोटे डोंगर तयार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात राख हवेत उडून नागरिकांच्या डोळ्यांत जात असल्याने अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहेत.
त्यासमोरच गडचिरोलीचे-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान यांच्या मालकीची किरसान इंटरनॅशनल शाळा आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरदेखील राखेमुळे परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा राइस मील मालकांना तोंडी सांगण्यात आले.मात्र,राख टाकण्याचे काम आताही सुरूच आहे.या समस्येबाबत नुकतेच ग्रामपंचायत गणखैरा यांनी सर्व गिरणी मालकांना नोटीस बजावली असून या समस्येबाबत गोरेगाव तहसीलदारांनाही कळविले आहे.ही समस्या दूर न झाल्यास ग्रामपंचायत गणखैरा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!