Wednesday, October 28, 2026
Homeमुंबईआता वाहतूक पोलिसांना वाहनांचे डिजिटल कागदपत्रे धरता येणार ग्राह्य..

आता वाहतूक पोलिसांना वाहनांचे डिजिटल कागदपत्रे धरता येणार ग्राह्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-डीजी लॉकर वाहनांच्या कागदपत्र ॲपमधील वाहनांचे कागदपत्र दाखवूनही काही वाहतूक पोलीस व अधिकारी वाहन चालकांवर ई-चलन दंडात्मक कारवाई करतात.अशा तक्रारीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे अखेर पोलीस सह आयुक्तांनी वाहनांची डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत,असे कार्यालयीन आदेशच काढले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहनांमध्ये पूर्वी वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) सह विमा पॉलिसी,पीयूसी यांची मूळ प्रत ठेवणे बंधनकारक होते.परंतु केंद्र शासनाच्या रस्ते,वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या निर्देशानुसार वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच अन्य कागदपत्रांची डिजीटल कॉपी डीजी लॉकरवर ठेवू शकतात.परंतु वाहतूक विभागातील काही पोलीस शिपाई व अधिकारी डीजी लॉकरमधील कागदपत्रे दाखवूनही ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करीत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या होत्या.याची गंभीर दखल वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी घेतली.
वाहतूक नियंत्रण शाखेअंतर्गत असलेले सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी वाहन मालक व चालक यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र,वाहनाचा विमा,पी.यू.सी.यांची मागणी केल्यानंतर वाहन चालकाने त्यांच्या डीजी लॉकरमधील वाहनांची कागदपत्रे दाखवल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी; असेही निर्देश सहआयुक्तांनी दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!