- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-किती घोर कलियुग म्हणावे लागेल,विवाहित महिलेचे सुत जुळले खरे,मात्र प्रियकारास नकोशी वाटणाऱ्या ३ वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आईने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.सुरुवातीला मुलगी डोक्यावर पडून मृत पावल्याचा बनाव केला; मात्र,ऐन अंत्यसंस्काराच्यावेळी हत्येचे बिंग फुटले.प्रकरणी मुलीच्या वडिलांना संशय आला आणि बिंग फुटल्याने पोलिसांनी आरोपी आई व तिच्या प्रियकरास अटक केल्याची घटना खापरखेडा,ता.सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदा (कोराडी) येथे घडली.मानसी ताराचंद चामलाटे वय ३ वर्षे असे दुर्दैवी मुलीने नाव असून,अटकेतील आरोपींमध्ये तिची २९ वर्षीय आई व तिचा प्रियकर राजपाल मालवीय वय ३२ वर्षे,रा.देवास,जिल्हा उज्जैन,मध्य प्रदेश या दोघांचा समावेश आहे. मानसीचे आई-वडील मूळचे गोरेगाव,जिल्हा-गोंदिया येथील रहिवासी आहेत.मध्यंतरी तिची आई राजपालच्या संपर्कात आली आणि त्यांचे सूत जुळले. त्यामुळे तिची आई तिला सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी राजपालसोबत नांदा (कोराडी),ता.कामठी येथे राहायला गेली.
प्रियकराला मुलगी नको असल्याने तो मानसीच्या सौंदर्यावरून सतत टोमणे मारायचा.त्यामुळे आईच्या मनात तिच्याबद्दल द्वेष निर्माण झाला.याच द्वेषामुळे आईने २६ डिसेंबरला सकाळी मानसीच्या डोक्यावर जोरात लाकडी दांड्याने वार केला आणि तिला घरात बंद करून निघून गेली.सायंकाळी घरी परत आल्यावर तिला मानसी मृतावस्थेत दिसली.त्यामुळे तिने राजपालला सांगितले.त्याच्या सूचनेवरून ती मानसीला घेऊन गोरगावला गेली.तिथे अंत्यसंस्काराच्यावेळी हत्येचे बिंग फुटले आणि मानसीची आई व तिचा प्रियकर या प्रकरणात अडकला.दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर खापरखेडा पोलिसांनी त्यांना सावनेरातील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना येत्या सोमवार ६ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बनाव करून आईच्या घरी पलायन👇
पत्नी सोडून गेल्याने मानसीचे वडील ताराचंद याने दुसरे लग्न केले.मानसीच्या हत्येचे बिंग फुटणार या भीतीने तिची आई गोरेगावला ताराचंदकडे केली. मानसी डोक्यावर पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे तिने ताराचंदला सांगितले. मानसीच्या डोके व शरीरावरील मार आणि अंगावरील चटक्यांचे डाग पाहून त्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीला संशय आला. अंत्यसंस्काराला गोळा झालेल्या नातेवाईकांनीही हाच संशय व्यक्त केला.त्यामुळे ताराचंदच्या दुसऱ्या पत्नीने गोरेगाव पोलिसांना कळविले आणि हत्येचे बिंग फुटले.
जमिनीत पुरलेला मृतदेह काढून पोस्टमार्टम👇
गोरेगाव पोलिसांनी गोंदिया एसडीएम यांची परवानगी घेतली आणि मानसीचा जमिनीत पुरलेला मृतदेह काढून पोस्टमार्टेम केले. पोस्टमार्टमचा प्राथमिक रिपोर्ट प्राप्त होताच पोलिसांनी मानसीची आई व तिच्या प्रियकरास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. गुन्ह्याची कबुली देताच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०३ (१), (३) (५) अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. शिवाय, प्रकरण पुढील तपासासाठी खापरखेडा पोलिसांकडे वर्ग केले.
- Advertisement -

