उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यात यावर्षी विद्युत टंचाई अभावी मक्याची लागवड ७० टक्के शेतकऱ्यांनी केली होती.परंतु तालुक्यात मात्र शासकीय मका खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी वर्ग यांच्याकडून मक्याची बेभाव खरेदी केली जात होती.त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता.मका खरेदी केंद्र सुरू करावे; याविषयीची मागणी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.त्या मागणीला सतत आमदार गजबे यांनी पाठपुरावा करून देसाईगंज तालुक्यात राष्ट्रसेवक बहुउद्देशीय सेवा केंद्रांना मका खरेदीची परवानगी मिळाली असून,ऑनलाईन नोंदणी शुभारंभ आज १३ मे २०२३ रोजी आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे,विसोरा येथील माजी सरपंच नितीन बनसोड,संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्जेकर, अनिल मस्के,पत्रकार अरुण राजगिरे,गौरव नागपूरकर, शुभम नागपूरकर,संस्थेचे सचिव विशाल कुर्जेकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.