उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- तालुक्यातील कोंढाळा येथील इसमाचा गावामध्ये ठेवण्यात आलेल्या बैठकीवरच विसावा घेतांना मृत्यू झाल्याची घटना आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असल्याने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार,कोंढाळा येथील खटू ऊर्फ प्रभाकर रामा बुराडे वय अंदाजे ५२ वर्षे हे काही काम करून घरी परत जात असतांना, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वार्ड क्रमांक ४ येथील राजू शिवणकर यांच्या घरासमोरील परिसरात ठेवण्यात आलेल्या बैठकीवर विसावा घेतला; विसावा घेत असतांना घरा नजिकचे काही नागरिक त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न करीत असतांना बुराडे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली.माहिती देताच पोलीस पाटील यांनी घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता,प्रभाकर बुराडे यांची प्राणज्योत मावळली असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यातील कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी तसेच जांभूळकर यांना देताच घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण माहिती व शहानिशा करून ठाणेदार किरण रासकर यांना कळविण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.