उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्रतिनिधी/नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर) :- गेली दोन वर्षे कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका लांबणीवर गेल्या होत्या.मात्र लांबणीवर गेलेल्या निवडणुकांचा सध्याच्या घडीला बिगुल वाजलेला होता.अशातच काँग्रेस पक्षाच्या १४ सीटा लढत होत्या; तर शेतकरी संघटनेच्या ८ तसेच बीजीपीच्या १४ अशा एकूण ३२ सीटांची लढत सुरु होती.परंतु २८ एप्रिल ला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आणि आज २९ एप्रिल २०२३ ला निकाल जाहीर झाला.
त्यामधे काँग्रेस पक्षाच्या १४ पैकी १३ जागांवर बाजी मारली व गोंडवानाच्या २ जागा व शेतकरी संघटनांच्या ३ जागा अशा मिळून १७ सीटा आघाडीने जिंकल्या आहेत.बिजेपी पक्षाला कोरपना तालुका बाजार समितीमध्ये चांगलाच दे धक्का बसला असून सदर निवडणूक बिन विरोधात झाली असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.