Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजकुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावच्या बोडेगाव रेतीघाटात उघडकीस आल्याने अवैध उत्खनन जोमात,तर देसाईगंज महसूल विभाग कोमात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. आश्चर्याची बाब म्हणजे,वाळू उत्खननाची वेळ संपूनही रेतीघाटात आठ ते दहा ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती उत्खनन करून त्याची वाहतूक साठवणूक केलेल्या ठिकाणी करीत होते.त्यामुळे,ग्रामीण भागात अवैध रेतीचा उपसा तसेच अवैधरीत्या रेतीची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर अंकुश घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक खरोखरच जिवंत आहेत काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात तर आहेच, याशिवाय रेती घाटाजवळ लागूनच एका शेतालगतच्या आडोशात जेसीबी ठेवलेली आढळून आल्याने रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कारण की,ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. एवढा सारा प्रकार घडत असतांनाही “ना हाक ना बोंब” म्हणजेच “आम्ही खुश तर तुम्ही खुश” अशीच करून कहाणी समजावी लागेल.नागरिकांच्या तक्रारीनुसार गडचिरोली जिल्हाधिकारी रेती घाटांची चौकशी लावतात. पण इकडे सर्व मिलीभगत असल्याने अवैध उपशावर पांघरून घातले जातेय,हे रेती घाटातील सारवा-सारव केलेल्या प्रकारावरून स्पष्टपणे निदर्शनास येते.अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत कुरुड येथील अतिरिक्त पदभार असलेले पी.एस.कुमरे यांना माहिती दिली असता,मी आता जाऊन येतो आणि बघतो,असे सायंकाळचे साडेसात वाजे सांगितले.आता ते खरोखरच रेती घाटावर गेले की काय?अन् सुरू असलेला अवैध उत्खनन बंद केला की काय? नाहीतर आज जातील अन् उद्या पूर्ववत सुरू,म्हणजेच ‘जशीची लंका तशीच’ असे व्हायला नको.नाहीतर याविरोधात आवाज बुलंद करण्याचा इशारा सुजाण नागरिकांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!