Thursday, January 22, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा व्हॉइस ऑफ मीडियाची कार्यकारिणी गठीत.. -तालुकाध्यक्षपदी विजय भैसारे तर सचिव विजय...

कुरखेडा व्हॉइस ऑफ मीडियाची कार्यकारिणी गठीत.. -तालुकाध्यक्षपदी विजय भैसारे तर सचिव विजय नाकाडे,कार्याध्यक्ष विनोद नागपुरकर यांची निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या सुचनेवरून जिल्हा कार्याध्यक्ष नासीर हाशमी यांच्या उपस्थितीत व्हॉईस ऑफ मिडीयाची कुरखेडा तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यात व्हॉईस ऑफ मिडीया तालुका अध्यक्षपदावर विजय भैसारे यांची तर सचिवपदी विजय नाकाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के,प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक,विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील बाराही  तालुक्यातील नव्याने कार्यकारिणी गठीत करण्याचे कार्य सुरू आहे.
अध्यक्षपदी विजय भैसारे तर सचिवपदी विजय नाकाडे यांची निवड होताच लगेच अध्यक्ष,सचिवांनी आपली सहकारी टिमची कार्यकारिणी सुद्धा त्याच बैठकीत गठीत केली.यात तालुका कार्याध्यक्षपदावर विनोद नागपूरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष शिवा भोयर,कार्यवाहक महेंद्र लाडे, प्रसिद्धी प्रमुख सिराज पठाण या सर्वांचे मार्गदर्शक व जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरकर व ताहीर शेख यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून श्याम लांजेवर,शालिकराम जनबंधू , राम लांजेवार,चेतन गहाणे आदींची निवड करण्यात आली.यावेळी बहुसंख्य पत्रकार  उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर हाशमी व सर्व पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व संघटनेच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.तर पत्रकारांच्या समस्या व येणाऱ्या अडचणी तसेच खासकरून पत्रकार भवना करीता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष/सचिवांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!