Friday, September 4, 2026
Homeनागपूरमतांच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम; बेईमान भावांना तू माफ करशील का? -...

मतांच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम; बेईमान भावांना तू माफ करशील का? – विजय वडेट्टीवारांनी बहिणींना लिहिले पत्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विधानसभा निवडणुकी दरम्यान लाडक्या बहिणी मानून महायुती सरकारने निवडणुकीत २,१०० रुपये देण्याचे वचन दिले होते.पण आता विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेईमानी सुरू आहे.हे अन्यायकारक आहे.कोणताही भाऊ आपल्या बहिणीशी असे वागू शकतो का,असा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल.मतांच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावांना तू माफ करशील का’, असा प्रश्न राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना लिहिलेल्या खुल्या पत्रात विचारला आहे.
‘तुझा सन्मान म्हणून सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली.आम्हालाही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता म्हणून या योजनेचे स्वागत केले. आपण सर्व लाडक्या बहिणींनी या सन्मानापोटी महायुतीच्या झोळीत भरभरून मते टाकली.तुमच्या आशीर्वादाने हे सरकार सत्तेत आले.पण,हेतू साध्य झाल्यावर आता अटीशर्ती लावल्या जात आहेत.
एकीकडे महिलादिन,अभिमान,आदर आणि दुसरीकडे हेच लाडके भाऊ तुमची फसवणूक करत आहेत.या बेईमान भावांना तुझे रौद्र रूप दाखवण्याची वेळ आली आहे’, असे आवाहन वडेट्टीवार यांनी शुभेच्छा देतांना केले आहे.राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबतही त्यांनी पत्रात खंत व्यक्त केली आहे.ताई,या राज्यात तुला सुरक्षित वाटते का? दररोज महिला अत्याचाराच्या घटना ऐकून आम्हाला वेदना होतात, तू आई आहेस, तू बहिण आहे ताई, तू एक मुलगी देखील आहेस.अनेक नात्यात गुंतलेली तू माऊली आहेस. कोणत्याही क्षेत्रात भरारी घेऊन पुरुषांच्या पुढे जाण्याची शक्ती तुझ्यात आहे.पण जर तुलाच सुरक्षित वाटत नसेल,तर आम्ही नालायक भाऊ ठरतो! तुझ्या वेदना आमच्याही आहेत,रोज घडणारे अत्याचार बघून लाज आम्हालाही वाटते.
तू दुर्गा
तू जिजाऊ
तू सावित्री
तू रमाई आहेस
अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती तुझ्यात आहे.
ताई आज तरी तू शांत आहेस, तुझ्यात दुःख पचविण्याची खूप क्षमता असली, तरी आता मात्र तुझे रौद्र रूप या लाडक्या भावांना दाखवण्याची वेळ आली आहे.असे विजय वडेट्टीवार यांनी जागतिक महिला दिनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!