Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीअन् बिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिका प्रेमी युगुलांना केले दूर..! - 'लव्ह...

अन् बिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिका प्रेमी युगुलांना केले दूर..! – ‘लव्ह स्टोरी’ चा शेवट होणार की बहरणार; चर्चांना उधाण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-‘प्यार किया तो डरना क्या’..! असे म्हणत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे गुप-चूप प्रेम-प्रकरण
बहरून आले.बहरलेल्या प्रेम-प्रकरणाची कानकुन लागली आणि हळूहळू सर्वत्र पसरल्याने शिक्षण विभागाकडे तक्रार झाल्याने बिचाऱ्या प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षिका प्रेमी युगुलांना दूर केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील एका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकतीच उघडकीस आल्याने ‘लव्ह स्टोरी’ चा शेवट होणार की आणखी बहरणार? अशा चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चामोर्शी तालुक्याच्या एका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आणि विज्ञान शाखेच्या शिक्षिकेची ‘लव्ह स्टोरी’ रंगू लागली.विशेष म्हणजे प्रेम हे कुणावरही होऊ शकते.प्रेमात आणि युद्धात कुठल्याही सीमा नाहीत. मात्र,ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवतो व संस्काराची भाषा शिकवतो,अश्यांना आपलेच गुरुवर्य लफडेबाज असल्याचे जेव्हा माहीत होते,तेव्हा विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.असाच काहीसा प्रकार उजेडात आल्याने याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीनंतर चौकशी करून मुख्याध्यापक व त्या शिक्षिकेची वेगवेगळ्या शाळेत तात्पुरती बदली केली. हे प्रेमीयुगूल शिक्षक दूर झाले असले तरी ते एकाच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या सेवा देत आहेत.पालकांच्या तक्रारीची दखल घेत व प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकताच शिक्षण विभागाने समितीमार्फत प्रकरणाची चौकशी केली. मात्र,समितीने तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी या चौकशीचा अहवाल अजूनही उघड केला नाही. तक्रारीमुळे दोघांनाही पंचायत समितीस्तरावरून चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली व कुनघाडा माल येथे बदली करण्यात आली आहे. मुख्याध्यापकास विकासपल्ली तर विज्ञान शाखेच्या शिक्षिकेला कुनघाडा माल शाळेत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!