Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार; आजची घटना..

वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना आज,शनिवारी ८ मार्चला सकाळच्या सुमारास मुल शहराजवळ घडली.६८ वर्षीय मल्लाजी पोचूजी येगावार रा.ता.मुल,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार,मुल तालुका तसेच इतर परिसरातील शेतकरी वर्ग धान पीक निघाल्यानंतर शेतात मेंढ्यांचा कळप बसवितात.त्यामुळे शेतात खत तयार होत असते.त्यातच मल्लाजी येगावार,मल्लाजीचा
नातू व शेतकरी शेतातील मोकळ्या जागेत झोपला होता.बाजूलाच मेंढ्यांचा कळप होता.अशातच झोपेतच वाघाने हल्ला चढवून वाघाने सुमारे एक किलोमिटर अंतरावर कोंसबी मार्गावरील नाल्याजवळ त्याचा मृतदेह ओढत नेला.सकाळी मल्लाजीचा नातू उठल्यानंतर त्याला आजोबा दिसले नसल्याने घरी सांगितले.त्यानुसार वनविभागाला माहिती देण्यात आली.शोधाशोध घेतल्यानंतर सोमनाथ मार्गावरील कोसंबी नाल्याजवळच्या झुडूपात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!