Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरकिती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी घेतल्याची घटना शनिवार १३ डिसेंबरला दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही शेत शिवारात घडली.वाघाने ४७ वर्षीय शेतकरी महिलेचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.छाया अरुण राऊत ४७ वर्षे,रा.गुंजेवाही, ता.सिंदेवाही असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव असून त्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या.सकाळपासून शेतावर गेलेल्या छाया ह्या सायंकाळ होऊनही घरी परतल्या नसल्याने कुटूंबीय तसेच गावातील नागरिकांनी शेत शिवारात शोध घेतला.पाहतात तो काय छाया यांचा मृतदेह
शेताजवळच रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती सिंदेवाही वनविभाग तसेच पोलिसांना देण्यात आली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात दहशत पसरली असून गावकऱ्यांनी वनविभागाप्रति तीव्र संताप व्यक्त करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!