उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- मागील काही वर्षांपासून अंत्यत दुर्मीळ असलेला काळा बिबट्याचे ताडोबात दर्शन होत होते. त्यामुळे जेनेटिक समस्येमुळे बिबट्याचा रंग काळा पडला असावा अशी चर्चा रंगत होती.परंतु काही दिवसांपूर्वीच एक मादी बिबट आणि तिच्यासोबत दोन काळ्या रंगाचे बछडे आढळून आल्याने पर्यटकही चक्रावून गेले.त्यांनी हा दुर्मीळ ठेवा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ जगप्रसिध्द आहे.त्यामुळे विदेश व देशातील पर्यटक सफारीसाठी येत असतात.वाघांच्या विविध करामतीमुळे पर्यटकही अचंबित होत असतात.तसेच अन्य वन्य जीवांच्या दर्शनाने पर्यटक जाम खुश होत असतात.मागील काही वर्षात काळ्या रंगाच्या बिबट्याचे दर्शन ताडोबात झाले होते.त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.परंतु त्यानंतर त्यांचे बऱ्याच कालांतराने दर्शन झाले.जानकारांनी जेनेटिक कारणामुळे त्याचा रंग काळा झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.काळ्या रंगाचे बिबत अन्य बिबट्याप्रमाणेच आहे.फक्त त्याचा रंग काळा आहे. ताडोबात केवळ एकटाच बिबट दिसून येत होता.परंतु काही दिवसांपूर्वीच ताडोबाच्या मदनापूर गेट परिसरात एक सामान्य मादा बिबट्यासोबत दोन काळे बिबट दिसून आले.हे बछडे नक्कीच त्या काळ्या नर बिबटचे असावे,असा अंदाज आहे. त्यामुळे ताडोबात दुर्लभ जातीच्या काळ्या रंगाच्या बिबट्याची भर पडल्याची शक्यता नाकारता येत नाही.