Wednesday, June 24, 2026
Homeभंडाराग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्याचे स्थानांतरण करून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा

ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्याचे स्थानांतरण करून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा (दिघोरी मोठी) :- दिघोरी येथील ग्रामविकास अधिकारी अनिल धमगाये यांचे स्थानांतर करून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; या मागणीचे निवेदन दिघोरीचे उपसरंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात, दिघोरीचे ग्रामविकास अधिकारी धमगाये हे ग्रामपंचायत सदस्यांसोबत असभ्य वर्तवणूक व अरेरावी करतात.सदस्यांनी तसे कामासंबंधी माहिती मागितल्यास माहितीचा अधिकार लावा अशी भाषा वापरतात.सभेत प्रश्न विचारल्यास मोठ्याने आवाज काढून दाबण्याचा प्रयत्न करतात.कुठल्याही कामाची अपूर्ण माहिती देऊन अंधारात ठेवतात. गावकऱ्यांसोबत गैरवर्तवणूक करतात.यासंबंधी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित सभेत धमगाये यांचे स्थानांतरण इतरत्र करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.तसे न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.सीईओंना निवेदन देतेवेळी,उपसरपंच विजय खोब्रागडे,ग्रापं सदस्य महादेव कांबळे, मोतीराम हुकरे,सत्यपाल पेंदाम,संध्या अवचट,वर्षा अवचट,लोचना आळे,पद्मा देशमुख, जायवन नंदेश्वर,प्रतीमा ढोके,कविता गोटेफोडे उपस्थित होते.

अनिल धमगाये,ग्रामविकास अधिकारी,दिघोरी (मोठी)👇

कार्यालयात कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना मी अरेरावीची भाषा वापरली नाही.सदस्यांनी मागितलेली माहिती त्यांना देत असतो.कुणासोबतही गैरवर्तवणूक केले नाही किंवा अंगावर धावून जात नाही.माझ्यावर लावले गेलेले आरोप खोटे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!