- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-हृदयविकाराच्या धक्क्याने आईचा अचानक मृत्यू झाल्याने शोकाकुल अल्पवयीन लेकीने खोलीची आतील कडी लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल,रविवारी १७ नोव्हेंबरच्या पहाटे उघडकीस आली.गायत्री श्रीनिवास कादासी वय १६ वर्षे रा.रामनगर असे मृतक मुलीचे नाव आहे.
घुग्घुस येथील रामनगर वेकोलि वसाहतीत श्रीनिवास कादासी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.कादासी यांच्या पत्नी तिरुमला वय ४२ वर्षे हिला शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.झटका आल्याने
वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला नेत असताना रात्री १.३० वाजता तिचा वाटेतच मृत्यू झाला.आईचा मृतदेह घरी आणल्याचे पाहून मुलगी गायत्रीने हंबरडा फोडला.कुटुंबीय व नातेवाइकांनी तिला धीर देत घरातील खोलीत आराम करण्यास नेले. सोबतचे नातेवाईक खोलीतून बाहेर निघाल्यानंतर गायत्रीने आतून कडी लावून घेतली.शोकाकुल सर्व कुटुंबीय रात्रभर मृतदेहाशेजारी जागरण करीत होते.
गायत्री खोलीत झोपी गेली असावी,असा सर्वांचा समज झाला.त्यामुळे कुणीही तिला रात्री उठविण्याचा प्रयत्न केला नाही.पहाटे ४.३०च्या सुमारास दार ठोठावले असता प्रतिसादच मिळाला नाही.त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दार खोलून पाहिले असतांना गायत्रीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -